Ad will apear here
Next
एकांत...



अरे बाप रे! उठायला उशीर झाला... जरा चडफडतच ती उठली. म्हणजे व्यायामाला सुट्टी द्यावी लगणार. पटापट आवरून नेह सारखं ती ऑफिसला गेली. कामं वाट बघत होती..

म्हणता म्हणता आठ तास निघून गेले.

खरंच असंच आयुष्य निघून चाललंय नाही का?! ह्या विचारांनी तिच्या अंगावर काटा आला. खरंय का हे...?? पूर्णपणे खरं नसलं तरी थोड खरंय.

किती गोष्टी करायच्या आहेत तिला.. आईऽऽ.. अशा हाकेने ती भानावर आली आणि परत वेळेची चक्रं चालू झाली... अगदी त्या दिवसापर्यंत. त्या दिवशी अचानक मोकळा दिवस तिच्या वाट्याला आला.

घरातले सगळे ट्रिपला गेले होते. सकाळी ऑफिसमधून फोन आला, ‘आज सुट्टी जाहीर केलीय’ आणि सगळा दिवस अंगावर आल्यासारखा वाटला... ती बावरली.. मग तिने त्यांना फोन केला, ‘कुठे पोहोचला आहात? मला सुट्टी मिळाली आहे..’ सगळे हळहळले... ‘तू एकटी आहेस..’ वगैरे म्हणाले.

एकटी!!... हेच तर हवं होतं आपल्याला. किती वर्षांत असा एकांत मिळालाच नाहीये. मग छान समाधानानं हसत ती थोड्या वेळ लोळली.. गुलजारची गाणी ऐकत असताना... मधूनच भीमसेन ऐकावे वाटले. मग निवांत खूप वेळ आंघोळ करून तिने वरण भात आणि लिंबाचं लोणचं खाल्लं.. आजीकडे नेहमी असंच खायचो ना आपण! किती वेळ तरी ती बसल्या बसल्या आजोळी जाऊन आली; पण तिची खूप लोकं कित्येक दिवस वाट पाहत होती.. पुलं, माडगूळकर, दुर्गाबाई भागवत, अनिल अवचट.... खूप खूप होते. ती अधाशासारखं त्यांना भेटली.. दुर्गाबाईंच्या झाडांच्या आठवणी वाचताना तिला तिची झाडं आठवली. मग उठून कुंडीतल्या झाडांशी गप्पा मारल्या. त्यांना बरेच वेळा पाणी घालतानासुद्धा भेट नाही घेत आपण त्यांची...

चहा घेत झोपाळ्यावर कित्येक वेळ बसल्यावर वाटलं, रोज असंच आयुष्य गेलं तर किती मजा येईल. आराम, एकांत.. पाहिजे ते करणं?! रोज ते करणं शक्य नाही सध्या तरी, पण मनासारखं असं जगलं पाहिजे हे मात्र नक्की... तेवढ्यात फोन वाजला. ‘हां कधीपर्यंत येताय.. जेवायचं काय?... वगैरे वगैरे’


- कल्याणी भोगले

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/RZXXCL
Similar Posts
स्वप्नं आणि स्वप्नं स्वप्नं... खूप खूप स्वप्नं.... एकामागून एक काही शुभ्र, काही काळी, तपकिरी.. निळी, हळवीसुद्धा...एकामागून एक येतात... मन डोलत राहतं... स्वप्नं पडत राहतात. त्याच्या पाठीवर पाय ठेवून सत्याचा जन्म होतो. मनाला बरं वाटतं...पायाखाली खरखरीत स्थैर्य येतं....पण
आकाशफुले...! जीए नावाचं गूढ थोडंसं उकलताना...! एखादा दिवस आयुष्याला असा काही धक्का देऊन जातो, की त्याची सुखद जाणीव प्रत्येक पावलासोबत जवळ राहते. तो दिवसही मनात वेगळा कप्पा तयार करून स्वतःहूनच त्यामध्ये जाऊन बसतो. अधूनमधून बाहेर डोकावतो, आणि नव्या दिवसावरही तो जुना, सुखद अनुभव गुलाबपाण्यासारखा शिंपडून जातो... अगदी अलीकडचा तो एक दिवस असाच, मनाच्या कप्प्यात जाऊन बसला
पानगळ हे बागडणं, नाचणं, समर्पण, उगवणं, फुलणं, फळणं आणि कोमेजणं‌.... पुन्हा पुन्हा अखंड चालू आहे. परमेश्वराचं अस्तित्व आहे तोपर्यंत! हा चैतन्याचा प्रवाह असाच अखंड वाहत राहील. पानगळीतून वसंत फुलत राहील!!!
आई! आई... तब्बल दहा वर्षं या शब्दाचा कल्पनाविस्तार करण्याचा मी प्रयत्न करतोय. हजारो विचारांचे गुच्छ त्यासाठी आनंदाने समोर येऊन हात जोडून उभे राहत होते. आम्हालाही वापर.. म्हणत! पण काय होत होतं माहीत नाही. आपल्याकडे शब्दांचा पुरेसा साठा नाही, असंच सतत वाटत राहायचं. आज, या क्षणालाही तसंच वाटतंय. पण तरीही ठरवलं

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language